Marathi Ukhane For Male - लग्न झाल्या नंतर नवरी गृहप्रवेश करताना नवरेचे नाव काव्यमय वाक्य मध्ये घेते त्या वाक्यांना उखाणे असे म्हंटले जाते. उखाणे घेतल्यावरच वर-वधूना गृहप्रवेश करुण देतात.तुम्हाला या ब्लॉग मध्ये मराठी मधील नवीन उखाणे मिळणार आहेत. हे Marathi ukhane एकदम नवीन आणि अपडेटेड लिस्ट प्रमाणे आहेत.
 
 

Marathi Ukhane For Male

 
काही शब्द येतात ओठातून, …… चं नाव येतं मात्र हृदयातून.
काही शब्द येतात ओठातून, …… चं नाव येतं मात्र हृदयातून.
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,….मला मिळाली आहे अनुरूप.
गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन.
 

ukhane in Marathi for Male

 
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.
एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, …………. चे नाव घेतो……..च्या घरात.
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.
रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.
 
 
रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, … ला पाहून चंद्र-सुर्य हसे.
पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, … चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
मातीच्या चुली घालतात घरोघर, … झालीस माझी आता चल बरोबर.
शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता, … राणी मिळाली स्वर्ग आला होता.
नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, .. चे रुप आहे अत्यंत देखणे.
भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून, … चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.
Comments (0)
No login
color_lens
gif
Login or register to post your comment